प्रदूषण -एक समस्या
प्रदूषण -एक समस्या प्रदूषण ..प्रदूषण ..प्रदूषण आजच्या युगात समाजाला लागलेली एक कीड सर्वात मोठे संकट म्हणजे प्रदूषण होय प्रदूषण हे समाजाचे दुषण आहे प्रदूषण ही एक असा शाप आहे जो वैज्ञानिक क्रांती तू नच जन्माला आला आहे आज सर्व जगालाच या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे मग हे प्रदूषण म्हणजे नेमके आहे तरी काय ? तर प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण जल वायू भूप्रदेशात मिसळतात आणि त्यामुळेच आज प्रदूषणाच्या विविध प्रकारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे जसे जल प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूप्रदूषण इत्यादी माणूस आपल्या बुद्धीने नव्यानव्या गोष्टी निर्माण करतो पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का ?त्याचा विचार करत नाही उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगले नष्ट केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले जमिनीची धूप वाढली माणूस वैयक्तिक स्वच्छतेचा जेवढा विचार करतो तेवढा सार्वजनिक स्वच्छतेचा विचार करत नाही स्वतःचे घर तो अगदी नीटनेटके साफ करतो आणि घरातील हा कचरा रस्त्यावर टाकतो प्रवासात...