Posts

शाळा बंद, शिक्षण सुरू

Image
  शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम,                    माझी यशोगाथा video     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ममदापूर मराठी ,तालुका=राहता, जिल्हा= अहमदनगर  वर्गशिक्षिका= श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब     कोरोनाच्या विश्वव्यापी महामारी समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला. त्यात शिक्षणक्षेत्र देखील या संकटापासून वाचवू शकले नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशांमध्ये संचारबंदी लागू होऊन मार्च 2020 ला सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि क्षणभर वाटले मुक्त शिक्षणाची दारे आता बंद झाली.मन सैरभैर झाले.चोहो बाजूंनी कोरोनाचे वादळ आणि या सर्वांमध्ये हेलकावे खात असलेले आपले शैक्षणिक गलबते! मन अधिकच अस्वस्थ होऊ लागले. पण शिक्षणाची ही ज्ञानगंगा वाहती ठेवण्यासाठी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता.म्हणून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाशी  नाळ जुळलेली राहावी व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत जुळल...

उत्सव आनंदाचे

फुलोरा  कलेचे माहेरघर २४ जुलै २०२०  आजचा उपक्रम=उत्सव आनंदाचे आपल्या भारत देशांत प्रत्येक सण अगदी उत्साहाने ,आनंदाने साजरी केले जातात. हिंदूच नव्हे तर सर्वच धर्मात सणांना अनन्य साधारण महत्व आहे.एका अर्थाने या सणांमूळे आपण संस्कृती संवर्धन व संस्कृती संक्रमणाचे काम करत असतो. हे सण म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले आहे. सणांमूळे समाजात उत्साह,उल्हास, आनंद, आदसभाव वाढीस लागतो एकोपा टिकून राहतो. जीवनाला नवीन उभारी येते एक नवी दिशा मिळते.पर्यायाने देश एकसंध, बलशाली होतो.      सर्व सणांत परमेश्वराची भक्ती प्रधान आहे. बघा ना विचार केला तर प्रत्येक सण व निसर्ग ऋतू चक्र यांची सांगड अगदी योग्य पध्दतीने घातली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालून आपल्या जीवनाला एक नवचैतन्य या सणांनी दिले आहे. प्रत्येक सणांची निसर्गाशी सांगड घातली आहे. या पाठीमागे निसर्ग तुमचा अन्नदाता आहे, निसर्गाचे संवर्धन करा. तूम्ही निसर्गाला जपा म्हणजे निसर्ग तुम्हाला जपेल तूम्हाला भरभरून देईल असा संदेश जणू प्रत्येक सणांद्वारे प्राचीन ऋषीमुनींनी दिला आहे. म्हणूनच वर्षप्रत...

तस्मै श्री गुरवे नमः

Image
                तस्मै श्री गुरवे नमः  शिंपल्यात मोती तयार होण्यासाठी शिंपल्याला स्वाती नक्षत्राची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शिष्याच्या जीवनात परिपूर्णता आणण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. अशा या गुरु-पूजेचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा. हि भारतीय संस्कृती मध्ये 'व्यास पौर्णिमा' म्हणून ओळखली जाते. या दिवशी संस्कृतीला महान बनवणाऱ्या व संस्कृतीचे यशस्वी संक्रमण करणाऱ्या ऋषींचे अर्थात आपल्या संस्कृतीला पाचवा वेद म्हणून ज्याला गौरवण्यात येते,असा संस्कृतीचा महान ज्ञानकोश 'महाभारता सारखा' ग्रंथ ज्यांनी दिला,त्या वेद व्यासांच्या पूजनाचा कृतज्ञता दिवस म्हणजेच 'गुरुपौर्णिमा'होय.महर्षी व्यासांचे आचार आणि विचार समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक संत-महंत मोठ्या तन्मयतेने करत आहेत.व्यासांचे विचार ज्या ठिकाणाहून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम सतत चालू असते त्यास व्यासपीठ असे म्हणतात.व्यासपीठावरून जो विश्वकल्याणासाठी निस्वार्थ भावाने कार्य करतो, स्वतःचे जीवन व्रतस्थ करून वेद-मान्य,व्यास-मान्य, विचारांच्या ...

फुलोरा उपक्रम - ममत्व मातेच्या मनातील

Image
फुलोरा उपक्रम - ममत्व मातेच्या मनातील  आई माझा गुरु ,आई कल्पतरु         सौख्याचा सागरू, आई माझी      'आ'म्हणजे आत्मा 'ई'म्हणजे ईश्वर व या दोहोंचा संगम म्हणजे आई होय. खरंच या विश्वातील सर्वात सुंदर असं एक अस्तित्व ……..रचनाकार विधात्यानं परमोच्च अशी बनवलेली सोज्वळ मूर्ती कोणती असेल तर ती म्हणजे आई.       आई म्हणजे तिच्या बाळाची पहिली गुरु होय. ती आपल्या बाळावर जे संस्कार करते त्याच्या पायावरच तिच्या बाळाच्या जीवनाची भक्कम इमारत उभी राहते. म्हणून तर कोणत्याही महान राष्ट्राची निर्मिती व समाजाच्या प्रगतीत आईचे योगदान महान असते. जेथे मातृशक्तीचा आदर-सन्मान केला जातो तेथे सुखशांतीचे चिरंतर वास्तव्य असते.एक आई सुशिक्षित तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असते, संस्कारमय असते.आईची महिमा अपरंपार आहे. आईच्या प्रेमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.आईला मायेचा सागर म्हणतात कारण विशाल सागराप्रमाणे आई देखील आपल्या संततीचे सर्व रहस्य हृदयाच्या खोलीत अडवून ठेवते. जगात सर्व काही बनावट,नकली असू शकते पण आई व तिचे प्रेम कधीही बनावट नकली असूच शकत नाही. प्...

प्रदूषण -एक समस्या

Image
प्रदूषण -एक समस्या प्रदूषण ..प्रदूषण ..प्रदूषण आजच्या युगात समाजाला लागलेली एक कीड सर्वात मोठे संकट म्हणजे प्रदूषण होय प्रदूषण हे समाजाचे दुषण आहे प्रदूषण ही एक असा शाप आहे जो वैज्ञानिक क्रांती तू नच जन्माला आला आहे आज सर्व जगालाच या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे मग हे प्रदूषण म्हणजे नेमके आहे तरी काय ?        तर प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण जल वायू भूप्रदेशात मिसळतात आणि त्यामुळेच आज प्रदूषणाच्या विविध प्रकारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे जसे जल प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूप्रदूषण इत्यादी माणूस आपल्या बुद्धीने नव्यानव्या गोष्टी निर्माण करतो पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का ?त्याचा विचार करत नाही उंच उंच इमारती बांधण्यासाठी  त्याने जंगले नष्ट केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले जमिनीची धूप वाढली माणूस वैयक्तिक स्वच्छतेचा जेवढा विचार करतो तेवढा सार्वजनिक स्वच्छतेचा विचार करत नाही स्वतःचे घर तो अगदी नीटनेटके साफ करतो आणि घरातील हा कचरा रस्त्यावर टाकतो प्रवासात...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

Image
   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार                     शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो हे दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.असे म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले.ते एलफिस्टन हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले या काळात त्यांनी अखंड वाचन व वडिलांचे प्रोत्साहन यामुळे इंग्रजी भाषेचा पाया पक्का केला. सण 1912 मध्ये एलफिस्टन कॉलेजमधून बीए पूर्ण झाले. त्यानंतर बडोद्याच्या महाराजांनी शिक्षणासाठी केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी 23 जानेवारी 1913 रोजी बडोदा पोहोचले.तेथे त्यांना जातीयतेची तीव्र झळ पोहोचली. तेव्हा त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्यता निर्मूलनासाठी वाहून घेण्याचे ठरवले. पण लवकरच डॉक्टर बाबा आंबेडकरांची हुशारी पाहून बडोद्याच्या महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले.तेथे कोलंबिया विद्यापीठातून एमए व पीएचडी ची पदवी मिळवली. ज्याअभ्यासक्...

काव्यतरंग'विविध विषयांना स्पर्श करणारा काव्यसंग्रह. पुस्तक परीक्षण

Image
'काव्यतरंग'विविध विषयांना स्पर्श करणारा काव्यसंग्रह.         पुस्तक परीक्षण              (कवी=डॉ. भगवान हेबाडे)        पशुवैद्यकीय क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणारे कवी डॉ. भगवान हेबाडे यांनी काव्यतरंग या शीर्षकाखाली वेगवेगळ्या विषयांवर आपल्या भावना काव्य रुपाने व्यक्त केल्या आहेत. सोलापूर येथील मुक्ता प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे.मुखपृष्ठावर निखळ वाहणारा समुद्र, निरभ्र आकाश असे मोहक निसर्ग चित्र आहे. तर मलपृष्ठावर त्यांनी आपला व आपल्या कार्याचा परिचय थोडक्यात चित्रित केला आहे.डॉक्टर भगवान हेबाडे यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांनी 'मागे वळून पाहताना'हे आत्म चरित्र व 'अवघड वाटा'हा कथा संग्रह प्रकाशित केला आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर साहित्याची थोडीफार सेवा घडावी या हेतूने त्यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.      काव्यतरंग या कवितासंग्रहात एकंदर 46 कविता असून विविध विषयांना स्प...