फुलोरा उपक्रम - ममत्व मातेच्या मनातील

फुलोरा उपक्रम - ममत्व मातेच्या मनातील



 आई माझा गुरु ,आई कल्पतरु
        सौख्याचा सागरू, आई माझी 
    'आ'म्हणजे आत्मा 'ई'म्हणजे ईश्वर व या दोहोंचा संगम म्हणजे आई होय. खरंच या विश्वातील सर्वात सुंदर असं एक अस्तित्व ……..रचनाकार विधात्यानं परमोच्च अशी बनवलेली सोज्वळ मूर्ती कोणती असेल तर ती म्हणजे आई.
      आई म्हणजे तिच्या बाळाची पहिली गुरु होय. ती आपल्या बाळावर जे संस्कार करते त्याच्या पायावरच तिच्या बाळाच्या जीवनाची भक्कम इमारत उभी राहते. म्हणून तर कोणत्याही महान राष्ट्राची निर्मिती व समाजाच्या प्रगतीत आईचे योगदान महान असते. जेथे मातृशक्तीचा आदर-सन्मान केला जातो तेथे सुखशांतीचे चिरंतर वास्तव्य असते.एक आई सुशिक्षित तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असते, संस्कारमय असते.आईची महिमा अपरंपार आहे. आईच्या प्रेमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.आईला मायेचा सागर म्हणतात कारण विशाल सागराप्रमाणे आई देखील आपल्या संततीचे सर्व रहस्य हृदयाच्या खोलीत अडवून ठेवते. जगात सर्व काही बनावट,नकली असू शकते पण आई व तिचे प्रेम कधीही बनावट नकली असूच शकत नाही. प्रत्येक आई आपल्या मुलाला मोठ्यात मोठा यशस्वी झालेला पाहू इच्छिते. आई प्रत्येक क्षणी आपल्याला आनंद देत असते. आपण लाख वाईट असलो तरीदेखील आई आपल्या आयुष्यातून आम्हाला जीवन असते. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे वाक्य अगदी खरे आहे.खरेच ज्याला आई नाही तो अमाप धनदौलत असूनही भिकारी नाही काय?म्हणूनच मी मला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानते कारण माझी आई माझ्या सोबत आहे.माझा सर्वात चांगला मित्र म्हणजे माझी आई होय.आडाणी असूनही सुसंस्कृत आहे आणि या संस्कृत संस्काराची शिदोरी तिने आम्हाला दिलेली आहे.म्हणूनच आम्ही आमचे जीवन यशस्वीपणे घडवू शकलो. म्हणूनच म्हणावेसे वाटते 
       आई माझी मायेचा सागर
       दिला तिने जीवना आकार 
आई इतकी प्रेम, ममता आणि संस्कार दुसरे कोणीही देऊ शकत नाही. दिवसरात्र एक करून ती आपल्याला घडवत असते. तेही अगदी निस्वार्थपणे. यातच तिला परमोच्च आनंद प्राप्त होत असतो. आपल्या मुलांच्या प्रत्येक वेदना जपणारी, स्वतः उपाशी राहून पिलांची भूक भागविणाऱ्या आईची ममता अनुपम आहे. सर्व नात्यांचा ती मुकुटमणी आहे‌. म्हणूनच पहिला नमस्कार आईला व नंतर ईश्वराला कारण साकार ईश्वराला आईच जन्म देते. 
🌹फूलोरा कलेचे माहेरघर.
          
 लेखिका श्रीम. सोनवणे व्ही. एन.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्त्रीचे समाजातील स्थान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

कोरोना, लॉकडाऊन व शिक्षणाचे बदलते स्वरूप