स्त्रीचे समाजातील स्थान
स्त्रीचे समाजातील स्थान
छत्रपती शिवाजी महाराज, नमस्कार! माफी असावी, मी मुजरा नाही केला. कारण मुजरा करायला वाकले तर पडतील माझ्यावर सगळ्यांच्या नजरा.होय नजरा.तुम्हाला वाटत असेल अरे राज्यात चाललय काय? पण या राज्यात कोणतीच बहीण सुरक्षित नाही अन् नाही कोणती माय.आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती व्हाव लागतं. आपलीच माती होत राहते. एकट्याने आले तर लढूही,पण झूंडीने आले तर लढावच लागतं. साले उपभोग तर घेतातच पण जिवानिशीही मारतात. शिक्षा व्हायचे लांब फक्त कॅन्डल मार्च काढतात? अत्याचार व्हायला लागतात फक्त दहा मिनिटे पण खटले दहा वर्षे चालतात. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर तीला पुन्हा तेच तेच सांगावं लागतं. शिवरायांचा धडा आम्ही शिकलो अभ्यासात पण त्यातून काही शिकलोच नाही आम्ही. कुठला धडाच घेतला नाही आपण. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला तो पेलवलाच नाही. वाईट वाटतं महाराज, खूप वाईट वाटतं. पण फक्त सकाळी उठून चहा पिताना पेपर मधल्या बातम्या वाचताना फक्त डोळ्यात पाणी फक्त डोळ्यात पाणी येत.एक सांगू का महाराज आम्हा सर्व बायकांना वाटते की,तुम्ही पुन्हा अवतार घ्यावा. तिथल्या तिथं फैसला होईल असा शासक पुन्हा व्हावा, असा शासक पुन्हा व्हावा. या भावना आहेत समाजातील प्रत्येक स्त्रीच्या. ही कळकळीची विनंती आहे आजच्या समाजातील प्रत्येक स्त्रीची. समाजात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहून स्त्रीचे समाजातील स्थान काय आहे याची जाणीव आपल्याला होते. हिंगणघाटमधील प्राध्यापक तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याची घटना, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण ,कोपर्डी ची घटना, पुणे येथील एका शाळकरी मुलीला ॲसिड टाकण्याची धमकी देऊन लैंगिकअत्याचार करण्याचा प्रकार, अशा एक ना अनेक घटना त्यातील काही घटना दबल्याही गेल्या अशा घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. खरंच आजच्या समाजात स्त्री सुरक्षित आहे का? मंदिरामध्ये तर तिला लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा अशा विविध रूपात पूजले जाते,पण रस्त्यावर येताच ती एक उपभोग्य वस्तू बनते, हेच का तिचे समाजातील स्थान? महिला अत्याचाराची ही खाली घटना घडली सोशल मीडियातून फेसबूक, व्हाट्सअप वर सहानुभूतीपूर्वक मेसेजेस येतात लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघतात. आणि व पुन्हा काही दिवसात या घटनांचा विसर पडून पुन्हा तोच गुन्हा करायला हे समाजकंटक तयार होतात. खरं तर समाज कितीही बदलला असला तरी आपल्याकडे असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे लहानपणापासूनच स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते.तिला थोडी दुबळी समजली जाते. 'पायातील चप्पल पायात ठेवली पाहिजे' या दृष्टिकोनामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कनिष्ठ दर्जाचा असतो व तिला दुर्बल समजले जाते.आज समाज पूर्णपणे बदलला असला तरी जुनाट विचारधारणा मात्र कायम स्वरूपी घर करून आहेत.सर्वांना फक्त वंशाचा दिवा हवा आहे. चिमण्या मुली त्यांना नकोशा झालेल्या आहेत.वैज्ञानिक प्रगतीमुळे मुलीचा जन्म नाकारला जातो.वंशाचा दिवा जन्माला आल्याने सगळीकडे आनंदीआनंद होतो. या आनंदाच्या भरात त्या चिमुकलीच्या गरजा, समस्या,तिचा विकास याकडे अक्षरश: दुर्लक्ष केले जाते. निसर्गनियमानुसार ती मोठी होते.ताई असूनही तिच्या छोट्या भावालाच तिच्यापेक्षा जास्त अधिकार दिले जातात. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी प्रथम समाजाने तिच्याकडे माणूस म्हणून पहाणे गरजेचे आहे. स्वयं-संरक्षणाचे धडे शाळा कॉलेजमधून दिले गेले पाहिजे. तिच्या सर्व प्रकारच्या गरजांची पूर्तता करून तिच्या विचारशक्तीला चालना मिळाली पाहिजे. तरच ती स्वाभिमानाने जगण्यास समर्थ बनेल. महिला अत्याचाराचे खटले तातडीने मार्गी लावणे,तरुणांसाठी समुपदेशन केंद्र स्थापन करणे,प्रत्येक शाळेत मूल्यशिक्षणाद्वारे स्त्री-पुरुष समानता,स्त्रियांचा आदर करणे, इत्यादी मुल्ये रुजवण्यासाठी विविध सहशालेय उपक्रम राबवणे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे करणे त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अशी ठोस पावले उचलण्याची गरज समाजाला आणि शासनाला आहे.तरच देश घडविण्यासाठी स्त्रीचे योगदान मिळेल.कारण स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा व समाजाचा आधारस्तंभ आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते,'स्त्रियांना द्या इतका मान,की वाढेल आपल्या देशाची शान'कारण स्त्री प्रगतीशी संपूर्ण ममानवजातीची प्रगती निगडित आहे. आपल्या
भारतात अनेक महिलांनी अलौकिक कार्य केलेले आहे उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिरा गांधी,कल्पना चावला, किरण बेदी,मेरीकोम, सुनीता विल्यम्स,इत्यादी अनेक धडाडीच्या, तेजस्वी, कर्तबगार महिला पहायला मिळतात. सर्वच क्षेत्रात स्त्रिया पहिल्या स्थानावर आहेत. आणि म्हणूनच कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचे लक्षण म्हणजे त्या समाजातील स्त्रियांचा दर्जा सुसंस्कृत,आदरयुक्त व पुरुषांच्या बरोबरीने असायला हवा. तरच आजच्या या मुग्ध कलिका उद्या पुष्प बनून देशात सूसंस्काराचा सुगंध पसरवतील यात शंकाच नाही.
लेखिका=सोनवणे वैशाली नानासाहेब
जि.प.प्राथमिक शाळा,ममदापुर मराठी
मो.नं.=८९९९२६३५८८
Show quoted text
Show quoted text
Comments
Post a Comment