Posts

Showing posts from January, 2020

माझी सुंदर शाळा व माझे उपक्रम

Image
माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,ममदापूर मराठी हि एक उपक्रमशील शाळा असून शाळेत नवनवीन शालेय व सहशालेय उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यातील काही उपक्रमांचे क्षणचित्रे आपल्यासमोर सदर करत आहे. आपणही असे विविध उपक्रम आपल्या शाळेत घेऊन शिक्षण प्रक्रिया मनोरंजक व आनंददायी  करू शकता.  Ka ज्ञानरचनावाद  शैक्षणिक सहल

काव्यरंग

Image
*स्वप्नांचा झुला* आठवणींच्या फांदीला  झुला स्वप्नांचा बांधला लावले प्रयत्नांचे दोर झुला झुलाया लागला झुला झुलता झुलता गेला वर आभाळाला हात चंद्राला लावता चंद्र गालात हसला उनाड ढगांच्या आड डाव पाठशिवणीचा रंगला गेलं मन हरवून जीव स्वप्नात दंगला कशा नाचत बागडत आल्या चांदण्या खेळाया स्वप्नांच्या या नगरीत झोका देई भाऊराया आलं आनंदाला उधाण विसरून सारं भान बोल बोबड्या स्वरात गाई कष्टाचंच गाणं                        कवयित्री- सोनवणे वैशाली,                                       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर मराठी 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 फुलोरा कलेचे माहेरघर २१जुलै२०२०  आजचा उपक्रम त्रिवेणी काव्य प्रकार            निसर्ग    हिरवी धरती, हिरवी झाडे  इथे हिरवे फुलपाखरू बागडे      ...