Posts

Showing posts from July, 2020

उत्सव आनंदाचे

फुलोरा  कलेचे माहेरघर २४ जुलै २०२०  आजचा उपक्रम=उत्सव आनंदाचे आपल्या भारत देशांत प्रत्येक सण अगदी उत्साहाने ,आनंदाने साजरी केले जातात. हिंदूच नव्हे तर सर्वच धर्मात सणांना अनन्य साधारण महत्व आहे.एका अर्थाने या सणांमूळे आपण संस्कृती संवर्धन व संस्कृती संक्रमणाचे काम करत असतो. हे सण म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले आहे. सणांमूळे समाजात उत्साह,उल्हास, आनंद, आदसभाव वाढीस लागतो एकोपा टिकून राहतो. जीवनाला नवीन उभारी येते एक नवी दिशा मिळते.पर्यायाने देश एकसंध, बलशाली होतो.      सर्व सणांत परमेश्वराची भक्ती प्रधान आहे. बघा ना विचार केला तर प्रत्येक सण व निसर्ग ऋतू चक्र यांची सांगड अगदी योग्य पध्दतीने घातली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालून आपल्या जीवनाला एक नवचैतन्य या सणांनी दिले आहे. प्रत्येक सणांची निसर्गाशी सांगड घातली आहे. या पाठीमागे निसर्ग तुमचा अन्नदाता आहे, निसर्गाचे संवर्धन करा. तूम्ही निसर्गाला जपा म्हणजे निसर्ग तुम्हाला जपेल तूम्हाला भरभरून देईल असा संदेश जणू प्रत्येक सणांद्वारे प्राचीन ऋषीमुनींनी दिला आहे. म्हणूनच वर्षप्रत...

तस्मै श्री गुरवे नमः

Image
                तस्मै श्री गुरवे नमः  शिंपल्यात मोती तयार होण्यासाठी शिंपल्याला स्वाती नक्षत्राची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शिष्याच्या जीवनात परिपूर्णता आणण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. अशा या गुरु-पूजेचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा. हि भारतीय संस्कृती मध्ये 'व्यास पौर्णिमा' म्हणून ओळखली जाते. या दिवशी संस्कृतीला महान बनवणाऱ्या व संस्कृतीचे यशस्वी संक्रमण करणाऱ्या ऋषींचे अर्थात आपल्या संस्कृतीला पाचवा वेद म्हणून ज्याला गौरवण्यात येते,असा संस्कृतीचा महान ज्ञानकोश 'महाभारता सारखा' ग्रंथ ज्यांनी दिला,त्या वेद व्यासांच्या पूजनाचा कृतज्ञता दिवस म्हणजेच 'गुरुपौर्णिमा'होय.महर्षी व्यासांचे आचार आणि विचार समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक संत-महंत मोठ्या तन्मयतेने करत आहेत.व्यासांचे विचार ज्या ठिकाणाहून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम सतत चालू असते त्यास व्यासपीठ असे म्हणतात.व्यासपीठावरून जो विश्वकल्याणासाठी निस्वार्थ भावाने कार्य करतो, स्वतःचे जीवन व्रतस्थ करून वेद-मान्य,व्यास-मान्य, विचारांच्या ...

फुलोरा उपक्रम - ममत्व मातेच्या मनातील

Image
फुलोरा उपक्रम - ममत्व मातेच्या मनातील  आई माझा गुरु ,आई कल्पतरु         सौख्याचा सागरू, आई माझी      'आ'म्हणजे आत्मा 'ई'म्हणजे ईश्वर व या दोहोंचा संगम म्हणजे आई होय. खरंच या विश्वातील सर्वात सुंदर असं एक अस्तित्व ……..रचनाकार विधात्यानं परमोच्च अशी बनवलेली सोज्वळ मूर्ती कोणती असेल तर ती म्हणजे आई.       आई म्हणजे तिच्या बाळाची पहिली गुरु होय. ती आपल्या बाळावर जे संस्कार करते त्याच्या पायावरच तिच्या बाळाच्या जीवनाची भक्कम इमारत उभी राहते. म्हणून तर कोणत्याही महान राष्ट्राची निर्मिती व समाजाच्या प्रगतीत आईचे योगदान महान असते. जेथे मातृशक्तीचा आदर-सन्मान केला जातो तेथे सुखशांतीचे चिरंतर वास्तव्य असते.एक आई सुशिक्षित तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असते, संस्कारमय असते.आईची महिमा अपरंपार आहे. आईच्या प्रेमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.आईला मायेचा सागर म्हणतात कारण विशाल सागराप्रमाणे आई देखील आपल्या संततीचे सर्व रहस्य हृदयाच्या खोलीत अडवून ठेवते. जगात सर्व काही बनावट,नकली असू शकते पण आई व तिचे प्रेम कधीही बनावट नकली असूच शकत नाही. प्...