कोरोना, लॉकडाऊन व शिक्षणाचे बदलते स्वरूप कोरोनाच्या विश्वव्यापी महामारी ने समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.जसे आरोग्य,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,कौटुंबिक इत्यादी.शैक्षणिक क्षेत्र देखील या संकटापासून वाचू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन अनिश्चिततेच्या सावटाखाली वावरत आहे.विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये लागू असलेल्या संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. यामुळे ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाशी नाळ जुळलेली रहावे व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेशी जुळलेला राहावा यासाठी शिक्षक वर्क फ्रॉम होम उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत अनेक शाळांनी पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध शैक्षणिक ॲप डाऊनलोड करून दिले आहे. या ॲप्सचा वापर वर्गनिहाय, शाळा निहाय पालकांचे सोशल मीडिया ग्रुप तयार करून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामध्ये भाषा विषयाचे निगडित कथाकथन, गोष्टी, वाचन-लेखन,वर्तमानपत्रे, मासिके हस्ताक्षर ,बौद्धिक खेळ,शब्दकोडे,शब्द संपत...
very good to see your blog of Edu.guru
ReplyDelete