कोरोना, लॉकडाऊन व शिक्षणाचे बदलते स्वरूप

कोरोना, लॉकडाऊन व शिक्षणाचे बदलते स्वरूप

कोरोनाच्या विश्वव्यापी महामारी ने समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.जसे आरोग्य,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,कौटुंबिक इत्यादी.शैक्षणिक क्षेत्र देखील या संकटापासून वाचू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन अनिश्चिततेच्या सावटाखाली वावरत आहे.विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये लागू असलेल्या संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. यामुळे ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाशी नाळ जुळलेली रहावे व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेशी जुळलेला राहावा यासाठी शिक्षक वर्क फ्रॉम होम उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत अनेक शाळांनी पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध शैक्षणिक ॲप डाऊनलोड करून दिले आहे. या ॲप्सचा वापर वर्गनिहाय, शाळा निहाय पालकांचे सोशल मीडिया ग्रुप तयार करून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामध्ये भाषा विषयाचे निगडित कथाकथन, गोष्टी, वाचन-लेखन,वर्तमानपत्रे, मासिके हस्ताक्षर ,बौद्धिक खेळ,शब्दकोडे,शब्द संपत्ती उपक्रमांवर आधारित खेळ, कविता, वाक्प्रचार इत्यादी तर गणिताशी संबंधित संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, भुमितिक आकृत्या, मापन,इत्यादी अनेक घटकांवर आधारित अभ्यासक्रम तसेच कला कार्यानुभव अंतर्गत चित्रकला, रांगोळी, कातरकाम, चिकट काम, शिल्पकाम, असे अनेक उपक्रम पालकांच्या मदतीने शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेत आहे म्हणजेच खर्‍या अर्थाने आजचे शिक्षण् ई-लर्निंगच्या स्वरूपात होत आहे. . पालक सहभाग व बालकांचा विकास=शिक्षण ही मानवी जीवनाची आवश्यक प्रक्रिया आहे.शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनी शिक्षण प्रक्रियेत घेतल्यास ध्येयपूर्ती होऊ शकते. बालकांचा बौद्धिक,शारीरिक,मानसिक, भावनिक, व सामाजिक विकास होण्यासाठी पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहेत.आज कोरोनाच्या संचारबंदीने ही संधी पालकांना उपलब्ध करून दिली आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक सुसंवादाचे व पालकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.सोशल मीडियावरील ग्रुप द्वारे वर फ्रॉम होम या उपक्रमाअंतर्गत पालकांशी संवाद साधून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अधिकाधिक गरज आहे आणि म्हणूनच शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, सोशल मीडिया वरील व्हाट्सअप ग्रुप द्वारा पालकांशी संवाद घडवून आणत आहे व त्यांना मार्गदर्शन करत आहेत.जसे की बालकांच्या प्रगतीबाबत त्यांच्या अडीअडचणी सोडवणे, मुलांचा अभ्यास घेण्यास त्यांना प्रोत्साहन देणे,शिक्षक-पालक-विद्यार्थी संबंध जिव्हाळ्याचे व स्नेहाचे करणे, बालकांकडे लक्ष देण्याबाबत पालकांच्या चुकांचे, दोषांचे निराकरण करणे.याप्रमाणे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन करून शिक्षण प्रक्रिया यशस्वी व सुखकर करण्याचा प्रयत्न वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून शिक्षक करत आहे. मूल्यशिक्षण= मूल्यशिक्षण आजच्या काळाची गरज आहे.आणि आजच्या या काळात आपल्या मुलांवर योग्य व चांगले संस्कार करण्याची शिक्षणाचे धडे त्यांच्या अंगी रुजविण्याचे जास्तीत जास्त संधी पालकांकडे आज उपलब्ध आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन मुलांमध्ये चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंबातील, समाजातील सर्वांशी आदरयुक्त वर्तन करणे,सदाचार,सुसंस्कृतपणा इत्यादी गुणांची वाढ करणे,कोरोना संकटामुळे गरिबांचे होणारे हाल,उपासमार यासाठी त्यांना मदतीचा हातभार लावणे इत्यादींमधून मुलांची संवेदनशीलता वाढविणे, प्रत्येक काम वेळच्या वेळी नीटनेटके करण्याच्या सवयी,स्वयंशिस्तीचे धडे,घरातील छोटी छोटी कामे करण्याची मुलांना सवय लावणे व श्रमप्रतिष्ठा वाढीस लावणे.मुलांना त्यांच्या कौशल्य विकासासाठी भरपूर अशा संधी उपलब्ध करून देणे,कोणत्याही प्रकारचे धाक,दडपण न आणता मुलांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करून त्यांच्यात ही मूल्य रुजविण्याची चांगली संधी सर्व पालकांना आज या करोना विषाणूने निर्माण करुन दिली आहे. शारीरिक शिक्षण व आरोग्य= कोरोनाच्या संचार बंदीच्या काळात आपल्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासाकडे ही लक्ष देणे आता शक्य झाले आहे.व्यायाम, योग,प्राणायाम, तसेच मोबाईल गेम्स ऐवजी छोटे छोटे मनोरंजक खेळ, बौद्धिक खेळ उदाहरणार्थ बुद्धिबळ, कॅरम,लुडो चंपुल इ. द्वारे आपल्या मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकाससाधणे सहजशक्‍य झाले आहे. आज कोरोना च्या भीतीने का होईना पण मुलांना स्वच्छतेच्या व आरोग्याच्या सवयी लावणे सोपे झाले आहे.वारंवार हात स्वच्छ धुणे,स्वच्छता राखणे,स्वच्छ कपडे घालणे, परिसर स्वच्छता ठेवणे इत्यादी सवयी मुलांच्या आता अंगवळणी पडल्या आहेत. आहारातील मुलांच्या आवडीनिवडी दूर झाल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने फास्टफूड, पिझ्झा, बर्गर ,कोल्ड्रिंग इत्यादींवर निर्बंध आलेली असल्यामुळे व कोरोना शी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असल्याने समतोल आहार घेण्याच्या सवयी मुलांमध्ये रूजवता येणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी आई मुलांना मुलाला भरवताना एवढे जेवण संपवून नाहीतर( काल्पनिक) भूत येईल धमकी युक्त भीती देत असे. परंतु आज खरोखरचं जेवण संपव नाहीतर कोरोनाचे भूत येईल असे म्हणून आई आपल्या बाळाला आहाराच्या चांगल्या सवयी लावत आहे. अनौपचारिक शिक्षण=शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे माहित नसलेल्या गोष्टी माहीत होणे व त्याचा व्यवहारात गरज पडेल तेव्हा वापर करता येणे. ही प्रक्रिया आनंददायी होणे आवश्यक असते.परंतु आजच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण ही शिक्षण प्रक्रिया अडकविल्या मुळे व तिला चार भिंतीत मर्यादित करून ठेवल्यामुळे ती नीरस आणि एकांगी होऊन बसली आहे. परंतु आज लॉकडाऊन च्या काळात मात्र तिचे स्वरूप खऱ्या अर्थाने अनौपचारिक होत असताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मुले शेती, पशूपालन,कुटिर उद्योग,पारंपारिक व्यवसाय,घरातील इतर कामात मदत, पाककला, शोभेच्या वस्तू बनवणे,वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, संगीत, गायन,वादन,चित्रकला,नृत्य,शिवणकाम, संगणक शिक्षण इत्यादी अनेक गोष्टीतून मुले घर बसल्या आपल्या पालकांच्या मदतीने व ई-लर्निंगच्या माध्यमातून कौशल्य विकसित करत आहेत व खऱ्या अर्थाने सहशिक्षणाची, अनौपचारिक शिक्षणाची संकल्पना यशस्वी होताना दिसत आहे.   

 लेखिका- श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब 
                जि प प्राथमीक शाळा ममदापुर मराठी

Comments

Popular posts from this blog

स्त्रीचे समाजातील स्थान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार