स्त्रीचे समाजातील स्थान
स्त्रीचे समाजातील स्थान छत्रपती शिवाजी महाराज, नमस्कार! माफी असावी, मी मुजरा नाही केला. कारण मुजरा करायला वाकले तर पडतील माझ्यावर सगळ्यांच्या नजरा.होय नजरा.तुम्हाला वाटत असेल अरे राज्यात चाललय काय? पण या राज्यात कोणतीच बहीण सुरक्षित नाही अन् नाही कोणती माय.आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती व्हाव लागतं. आपलीच माती होत राहते. एकट्याने आले तर लढूही,पण झूंडीने आले तर लढावच लागतं. साले उपभोग तर घेतातच पण जिवानिशीही मारतात. शिक्षा व्हायचे लांब फक्त कॅन्डल मार्च काढतात? अत्याचार व्हायला लागतात फक्त दहा मिनिटे पण खटले दहा वर्षे चालतात. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर तीला पुन्हा तेच तेच सांगावं लागतं. शिवरायांचा धडा आम्ही शिकलो अभ्यासात पण त्यातून काही शिकलोच नाही आम्ही. कुठला धडाच घेतला नाही आपण. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला तो पेलवलाच नाही. वाईट वाटतं महाराज, खूप वाईट वाटतं. पण फक्त सकाळी उठून चहा पिताना पेपर मधल्या बातम्या वाचताना फक्त डोळ्यात पाणी फक्त डोळ्यात पाणी येत.एक सांगू का महाराज आम्हा सर्व बायकांना वाटते की,तुम्ही पुन्हा अवतार घ्यावा. तिथल्या तिथं फैसला होईल असा...
👌👌
ReplyDelete