काव्यरंग
*स्वप्नांचा झुला*
आठवणींच्या फांदीला
लावले प्रयत्नांचे दोर
झुला झुलाया लागला
झुला झुलता झुलता
गेला वर आभाळाला
हात चंद्राला लावता
चंद्र गालात हसला
उनाड ढगांच्या आड
डाव पाठशिवणीचा रंगला
गेलं मन हरवून
जीव स्वप्नात दंगला
कशा नाचत बागडत
आल्या चांदण्या खेळाया
स्वप्नांच्या या नगरीत
झोका देई भाऊराया
आलं आनंदाला उधाण
विसरून सारं भान
बोल बोबड्या स्वरात
गाई कष्टाचंच गाणं
कवयित्री- सोनवणे वैशाली,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर मराठी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर मराठी
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
फुलोरा कलेचे माहेरघर
२१जुलै२०२०
आजचा उपक्रम त्रिवेणी काव्य प्रकार
निसर्ग
हिरवी धरती, हिरवी झाडे
इथे हिरवे फुलपाखरू बागडे
गाणे गाती उंच हे कडे!
स्वच्छ सुंदर, निसर्ग पाहू
त्यात आपण सर्व न्हाऊ
आनंदाने गाणे गाऊ
सप्तरंगी इंद्रधनुष्य अवतरले
छान उमलली ही रानफुले
धरणी मातेचे रूप खुले
कवयित्री =सोनवणे वैशाली नानासाहेब


Comments
Post a Comment