कोरोनाने माणसाला काय काय दिले…?

 कोरोनाने माणसाला काय काय दिले…?   

      ‘कोरोना’ चीन मधून आलेलं भयानक वादळ म्हणा किंवा चीनने  महासत्ता होण्याच्या स्वार्थापोटी जाणीवपूर्वक सोडलेलं एक महाभयंकर ब्रम्हास्त्र म्हणा,ते मला माहित नाही.पण ज्यामुळे आज संपूर्ण जगात हाहाःकार माजला आहे.सर्वजण या साथीच्या आजाराने हैरान झालेले आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात साथीचा आजार आजार पोहोचला आहे.  कोरोनामुळे संपूर्ण भारतातही लॉक डाऊन सुरू झाला आहे. एकीकडे कोरोना ग्रस्त रुग्णांची वाढती संख्या व दुसरीकडे लोक डाऊन मुळे होणारे गोर गरिबांचे हाल अशा एक ना अनेक दुःखद घटना हृदयाला वेदना देणाऱ्या आहेत.कोणी याला जैविक युद्ध म्हणतात तर कोणी कोरोनाला क्रूर शिक्षक म्हणतो काहीही असो  पण ही सर्व परिस्थिती पाहून खरंच वाटतय जगाचा विनाश जवळा लवकरच च् हि कलियुग संपून सत् युगा ला सुरुवात होणार आणि पुन्हा एकदा रामराज्य येणार विश्वास वाटू लागला आहे. सुखदुःखाचे हे निसर्गचक्र वर्षानुवर्ष सतत सुरू आहे. सध्या संपूर्ण जगावर असलेलं हे दुःखाचं साम्राज्य नक्कीच संपणार असा विश्वासही कोरोनाच्या  बदलामुळे वाटू लागला आहे.   
        विज्ञानापेक्षा सुद्धा कुणीतरी श्रेष्ठ आहे याची जाणीव आता आपल्याला होत आहे. खरंतर कोरोनाला शाप  म्हणावं की वरदान हेच कळत नाही. कारण lockdown च्या काळात कोरोनाने खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या. जीवन जगण्याची कला काय असते? हे देखील आपल्या नकळत आपल्याला सांगून गेला. सध्या स्पर्धेच्या युगात असलेल्या या शेफारलेल्या  माणसाला, त्याच्या उर्मटपणला दणका देऊन गेला. धावपळीच्या या जगात कुणाकडेही एकमेकांसाठी वेळ नव्हता.बाप मुलांना कित्तेक दिवस दिसत नव्हता. आईला मोबाईल शिवाय वेळ नव्हता. पाहुणे दारात येतात ते कधी परत जाणार असा विचार मनात येत असे.अशा दुरावलेल्या नात्याना कोरोनाने  जवळ आणले. सहकुटुंब सहपरिवार एकत्र आले. मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडून एकमेकांशी गप्पा मारू लागले. बालवाडीपासून सर्व मित्र मैत्रिणी घरातूनच का होईना पण बोलणं सुरू झालं. व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम, ची जागा बुद्धीबळ, साप शिडी ,व्यापार खेळ यासारख्या indoor gamesने  घेतली. सर्व हॉटेलचे पदार्थ व फास्ट फूडची जागा आता घरच्या स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थांनी घेतली.कॉल्ड ड्रिंक्स ची जागा औषधी अशा हळदीच्या दुधाने घेतली. आश्चर्य या गोष्टीचं वाटायला लागलं की, लॉकडाऊन मुळे आपण घरात असल्याने मुलांची काळजी, थोरामोठ्यांचे दुःख, एकमेकांच्या मतांचा आदर,  आवडी-निवडी यांची विचारपूस या गोष्टी पुन्हा पूर्ववत झाल्या. ज्यामुळे सगळं कुटुंब खऱ्या अर्थाने ठ हेवेदावे विसरून एका छताखाली आले आणि हा सुखद बदल घडवून आणणाऱ्या कोरोनाचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे नाही का?मग त्याला वरदानच का म्हणू नये? 
    कोणीतरी कोरोनाला क्रूर  शिक्षक म्हटले आहे. खरंच तो क्रूर आहे. आणि म्हणूनच त्याने  माणसाला वठणीवर आणले. कारण एक क्रूर शिक्षकच हे करू शकतो. त्याने दाखवून दिले, की अवघ्या 200 nanomitre सूक्ष्मजीवाच्या क्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत विकसित केलेले तंत्रज्ञान वैज्ञानिक प्रगती खूपच छोटी आहे. आणि निसर्गाला आव्हान देण्याएवध्ये  आपण नक्कीच मोठे नाही. त्यामुळे त्याच्या खुजेपणाची आणि निसर्गाच्या मोठेपणाची जाणीव कोरोनाने आपल्याला करून दिली आहे. त्याने दाखवून दिले कि,या जगात वर्ण,जात,पात,धर्म,वंश,गरीब,श्रीमंत,असा कोणताच भेदभाव नाही निसर्गापुढे सगळे सारखेच आहे.चुकला तो संपला.
       पैसा... पैसा... पैसा…या पैशाने  भाऊ-भाऊ वैरी झाला. किती अनर्थ या अर्थपायी माणसाकडून घडले? पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे आपल्याला कोरोनाने  शिकवले. कितीही पैसे असले तरी तुम्ही काही गोष्टी विकत घेऊ शकत नाही.आरोग्य, समाधान, आनंद, दृष्टिकोन, विचार अशा गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. तर त्या गमवाव्या लागतात आज कितीही श्रीमंत कोरनाग्रस्त रुग्ण असो, सरकारी दवाखान्यात दाखल करावं लागतं ना..
        ‘स्वच्छता हीच सेवा’ असा संदेश देणारे स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे, महात्मा गांधी यांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण तर आपण कधी विसरलो होतो. पण  कोरोनाने मात्र पुन्हा आठवण करून दिली. सगळेच मिळून घराची साफसफाई करू लागलो. गावागावात, देशाच्या कानाकोपऱ्यात आता स्वच्छता होऊ लागली, बाहेरून आले की प्रत्येक वेळी हाथ पाय धुणे आता आपल्या अंगवळणी पडले. व कित्येक मोठ्या शहरातील  प्रदूषण कमी झाले. रस्त्यांवर धावणाऱ्यागाड्यांची संख्या कमी झाली . त्यामुळे काही प्रमाणात का होईना शुद्धता आली. जालंधर शहरातून पहिल्यांदाच 225 किलोमीटर अंतरावरच्या हिमाचल प्रदेशातील पहाड दिसू लागले, ओडिशा मध्ये किनाऱ्यावर कासवाला इतक्या निवांतपणे कधीच ऊन खाता आले नसते, लॉकडाऊन मुळे प्राणी, पक्षी मोकळा श्वास घेत आहे,स्वच्छंदी जीवन जगत आहे, गंगा नदीचे पाणी प्रथमच इतके स्वच्छ झालेले आहे,इटलीच्या वेनिस  नदीत पहिल्यांदाच डॉलफिनच स्वच्छंदीपणे बागडूलागले.आपलंही आयुष्य काही प्रमाणात का होईना पण सुखावह जाणवू लागलं. जगभरातला कितीही पैसा खर्च केला असता तरी जे शक्य नव्हतं एका छोट्या व्हायरस करून दाखवले.    
                कोरोनाने लोकांच्या गरजा कमी केल्या. आपल्या  जीवनावश्यक गरजा कोणत्या याचा जणू साक्षात्कारच आपल्याला झाला. घरातील कपड्यांनी भरलेली कपाट, चप्पल स्टैंड वर न मावणाऱ्या अनावश्यक चपला, अशा एक ना अनेक घरातील अनावश्यक वस्तू पाहून वाटतं खरंच गरज होती का? तरीही संग्रह ….कशासाठी? भविष्याचे नियोजन असे असावे का? कोरोना  म्हणतो आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे चुकीचे आहे. वर्तमान आनंदात घालवणे महत्वाचे आहे. क्या पता ‘कल हो ना हो’... ...अशा अनेक गोष्टी आहेतकि ज्याच्या शिवाय आपण जगू शकतो म्हणूनच अनावश्यक गरजा ओळखायला हव्यात व त्याची सवय टाळायला हवी. हा धडा कोरोनाने आपल्याला दिला.
          कोरोना शिकवतो की ,तुम्हीच तुमचे रक्षक आहात.तुम्ही तुमचे भाग्यविधाते आहात. खरच आपल्या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार असतो. आणि प्रशासन फक्त आपल्याला मार्गदर्शन करू शकतात पण त्यांचं पालन न करणे, हे प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे. स्वयंशिस्त गरजेची आहे. जबाबदार नागरिक असणे. ते कृतीतून दाखवणे फार महत्त्वाचे आहे. रामराज्यात देखील  ल्क्षमानाने लक्ष्मण रेषा आखून सीतेला लॉकडाऊन केले होते पण तिने ऐकले नाही व रामायण घडले.आपणही लॉकडाऊन चा आदेश ना पाळल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहे. परिस्थितीचे आकलन करणे महत्त्वाचे आहे. त्यातून शहाणे होणे अधिक महत्त्वाचे. दुसऱ्याने केलेल्या चुका परत आपण केल्या तर त्याचे परिणाम आणखी जास्त भयानक होतील असा इशारा हा कोरोनारुपी राक्षस आपल्याला देत आहे.
            शेवटी हा कोरोनारूपी राक्षस कधी जाणार हे माहित नाही पण या क्रूर शिक्षकाने  आपल्याला जें धडे दिले तें आपण निट समजून घेऊया व आपले जीवन सुखकर व आनंदी बनवूया.  
लेखिका==श्रींम.सोनावणे वैशाली नानासाहेब जि.प.प्राथमिक शाळा,ममदापूर मराठी,ता.राहाता जि.अहमदनगर   

Comments

  1. खूप सुंदर लेखन केले वैशू.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्त्रीचे समाजातील स्थान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

कोरोना, लॉकडाऊन व शिक्षणाचे बदलते स्वरूप