प्रदूषण -एक समस्या
प्रदूषण -एक समस्या
प्रदूषण ..प्रदूषण ..प्रदूषण आजच्या युगात समाजाला लागलेली एक कीड सर्वात मोठे संकट म्हणजे प्रदूषण होय प्रदूषण हे समाजाचे दुषण आहे प्रदूषण ही एक असा शाप आहे जो वैज्ञानिक क्रांती तू नच जन्माला आला आहे आज सर्व जगालाच या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे मग हे प्रदूषण म्हणजे नेमके आहे तरी काय ?
तर प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण जल वायू भूप्रदेशात मिसळतात आणि त्यामुळेच आज प्रदूषणाच्या विविध प्रकारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे जसे जल प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूप्रदूषण इत्यादी
माणूस आपल्या बुद्धीने नव्यानव्या गोष्टी निर्माण करतो पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का ?त्याचा विचार करत नाही उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगले नष्ट केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले जमिनीची धूप वाढली माणूस वैयक्तिक स्वच्छतेचा जेवढा विचार करतो तेवढा सार्वजनिक स्वच्छतेचा विचार करत नाही स्वतःचे घर तो अगदी नीटनेटके साफ करतो आणि घरातील हा कचरा रस्त्यावर टाकतो प्रवासात सार्वजनिक ठिकाणी तर याला मर्यादाच नाही निरुपयोगी गोष्टी कागदाचे कपटे माणूस कोठेही फेकून देतो यात प्लास्टिक कचरा तर फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो म्हणूनच आज शासनाला प्लास्टिक बंदी करण्याची वेळ आली आहे
माणसाला अत्यंत आवश्यकता असते ती शुद्ध हवेची जी आपल्याला चांगला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देते दूषित हवेमुळे अनेक जीव मृत्युमुखी पडतात माणसाला विविध अशा श्वासनाच्या आजारांना सामोरे जावे लागते कित्येक वनस्पती नष्ट होतात औद्योगीकरण वाढती कारखानदारी इत्यादीमुळे प्रदूषण वाढतच चालले आहे कारखान्यातील घाण पाणी हे नद्या समुद्रात सोडले जाते त्यामुळे पाणी दूषित होऊन जलप्रदूषण होते हेच पाणी पोटात गेल्याने पोटाचे अनेक आजार माणसाला जडतात समुद्रात हे पाणी सोडल्याने जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात व जलसंपत्तीचा ऱ्हास होतो असे दूषित पाणी शेतीला मिळाल्याने त्याचा विपरीत परिणाम पिकांवरही होतो मग पिकांवर कीड पडू नये म्हणून विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी केली जाते त्यामुळे जीवनसत्व अन्नधान्यातील पोषकता कमी होते व त्याचा परिणाम माणसाच्या प्रकृतीवर होतो हवा पाणी वायू यांच्यावर होणाऱ्या प्रदूषणा प्रमाणेच ध्वनिप्रदूषण ही आज एक मोठी समस्या निर्माण झालीआहे शहरातील गर्दी गोंगाट विविध सार्वजनिक कार्यक्रम सण उत्सव साजरे करताना मोठ्या आवाजात गाणी लावणे बँड वाजवणे मोठ्या आवाजाचे फटाके लावणे यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते यामुळे वृद्ध लहान मुले यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते म्हणूनच आता वेळ आलीआहे ती लोकांमध्ये या समस्येविषयी जनजागृती करण्याची जो पर्यंत ही जनजागृती होत नाही तोपर्यंत प्रदूषणा सारख्या भीषण समस्येपासून मुक्तता मिळणार नाही
पर्यावरण शुद्ध होण्यासाठी प्रदूषणाची सर्व कारणे काळजीपूर्वक लक्षात घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे वनसंरक्षण होऊन जंगलतोड थांबवली पाहिजे झाडे लावा झाडे जगवा या संदेशाचे प्रत्येक व्यक्तीने पालन केले पाहिजे शाळा कॉलेजमधून एक मूल एक झाड यासारखे उपक्रम राबवून वृक्ष संवर्धन केले पाहिजे समाजातील प्रत्येक व्यक्ती या बाबतीत जागरूक राहिली तर ही समस्या अल्पावधीतच सुटू शकेल प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे की मी प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करीन तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करीन असे केल्यास खऱ्या अर्थाने देशाची भविष्यात प्रगती होईल मानवाचे कल्याण होईल व जीवनसृष्टी सुद्धा सुरक्षित होईल.
श्रीमती सोनवणे व्ही.एन.
जि.प.प्राथमीक शाळा ममदापूर
मोबाईल नंबर 8999263588
👌👌👌👌
ReplyDeleteNice article 👍🏻
ReplyDelete